रामदास कदम हे तर ‘दाम’ दास कदम!, धनंजय मुंडे यांचा घाणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी प्रतिनिधी | आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. शिवसेनेच्या मंत्र्यांचे सुपुत्र येत्या निवडणुकांना उभे राहतायत आणि ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर असं माझ्या कानावर आलं आहे. तुम्ही भले त्यांना ‘राम’ म्हणत असाल. मात्र आम्ही त्यांना ‘दाम’दास म्हणतो. अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या कारभारावर केली. यावेळी त्यांनी रामदास कदम यांना ‘दाम’ दास कदम अशी उपमा देत टोला मारला. परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशी खेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, ज्या कोकणाने शिवसेनेला आपल्या जवळ करत भरभरून दिले, त्या शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले ? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचा केंद्रात उद्योग मंत्री असताना कोकणात एकही प्रकल्प आला नाही. राज्यात त्यांच्याच उद्योग मंत्री असतांना त्यांचे काय उद्योग सुरू आहे, तर फक्त भूसंपादनातून शेतक-यांची अडवणूक आणि लूट सुरू असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाऱ्या भाजपा सरकारला घरी बसवण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

निवडणुकांच्या तोंडावर या सरकारला वाटतंय की जीएसटीत बदल करावा, दहा टक्के आरक्षण द्यावं. मोदींनी एवढा अभ्यास केला तरी कधी? २०१४मध्ये ५० रूपयाला मिळणाऱ्या पेट्रॉलने ८० रूपयांचा टप्पा पार केला. तुम्हीच हिशोब लावा. मग सरकारकडून झालेली लूट लक्षात येईल.

नितीन गडकरी म्हणतात, अच्छे दिन- बिच्छे दिन कुछ नही होते, उसे महसूस किया जाता है, तुम्हीच सांगा तुम्हाला अच्छे दिन महसूस होत आहेत का? आता बस झालं, एकच निर्धार ‘अब की बार, मोदी की हार’. मोदी मोठे जादूगार आहेत. त्यांनी प्रत्येक कुटुंबाला पेट्रोल आणि गॅसच्या किमतीतून ६५ हजाराला लुटले. निरव मोदी, विजय मल्ल्या, चोक्सी देशाला लुटून पळून गेले. मग लोकांनी चौकीदार चोर म्हटलं की भाजपा कार्यकर्त्यांना राग का येतो? २०१९ला चौकीदाराला घरी बसवायचे आहे. मागील पाच वर्षांचा अपवाद वगळता राज्यात सेना-भाजपा पंधरा वर्षे एकत्र निवडणुका लढले. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्र लढा अथवा वेगळे लढा, आम्ही तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही मुंडे यांनी केले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment