धुळे जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात १ जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यात मोटर सायकल अपघातात १ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दिवानसिंग वेल्या पावरा असं मृतकाचे नाव असून जिल्ह्यातील तिखीबर्डी ता. शिरपूर येथील रहिवाशी होते.

दि. १९ फेब्रुवारी रोजी १.३५ वाजेच्या सुमारास गावाच्या शिवारात दिवानसिंग यांच्या मोटर सायकली अपघात झाला. या दिवानसिंग अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच गंगाराम वेल्या पावरा रा.तिखीबर्डी यांनी त्यांना शिरपूर कॉटेज रुग्णालयात त्यांना दाखल केले.

मात्र, दिवानसिंग यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेचे वृत्त तिखीबर्डी गावात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. सदर घटनेबाबत रुग्णालयातील वॉर्ड बॉय भगवान दगडु बोरसे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्याला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपघाताच्या गुन्हयाची नोंद झाली केली. सदर घटनेचा पुढील तपास हवालदार पी. पी. मोरे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.