हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मधुमेहाचा आजार संपूर्ण मानवी शरीराला हळूहळू पोकळ बनवतो, म्हणून त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आणली नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट डिसीस आणि नर्व डॅमेज होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, 2019 मध्ये मधुमेह हे मृत्यूचे नववे प्रमुख कारण होते. म्हणूनच मधुमेहाची लक्षणे वेळीच ओळखणे डॉक्टरांना महत्त्वाचे वाटते.
तोंडाच्या आतील मधुमेहाची लक्षणे
मधुमेहाची दोन लक्षणे तोंडाच्या आतही दिसतात, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. मात्र, ही लक्षणे सहजासहजी लोकांच्या लक्षात येत नाहीत. परिणामी, त्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कोरडे तोंड म्हणजे तोंडात कोरडेपणा आणि तोंडातून गोड किंवा फळांचा वास येणे ही देखील मधुमेहाची लक्षणे आहेत. ही लक्षणे हाय ब्लड प्रेशर किंवा हायपोग्लाइसेमियाशी संबंधितही असू शकतात.
‘या’ 7 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
जास्त तहान लागणे किंवा वारंवार लघवी होणे
आजारी वाटणे
खूप थकल्यासारखे
धूसर दृष्टी
अचानक वजन कमी होणे
तोंडात, घशात किंवा शरीरावर कुठेही फोड येणे
जखम भरण्यास उशीर होणे
मधुमेहाचे दोन प्रकार आहेत
मधुमेहाचे दोन प्रकार आहेत – टाईप-1 आणि टाईप 2. मधुमेह असलेल्या प्रौढांपैकी सुमारे 10 टक्के लोकं टाइप-1च्या प्रकारात आहेत, यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करू लागते. परिणामी, टाइप 1 मधुमेहास नियमितपणे इन्सुलिन घ्यायची गरज भासते.
तर टाइप-2 मधुमेहामध्ये शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा पेशी योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. टाइप 1 मधुमेह जास्त वजनाशी संबंधित आहे, ज्याचा उपचार केला जाऊ शकत नाही. तर टाईप-2 डायबिटीज वर मात करणे शक्य आहे. अशा लोकांना आपले वजन नियंत्रणात ठेवावे लागते. तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीतही खूप काळजी घ्यावी लागते.