हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचा सीजन असून उन्हाळा म्हंटल कि आंबा हा आलाच… फळांचा राजा म्हंटल जाणारा आंबा खाणे कोणाला आवडत नाही?? जवळपास प्रत्येकालाच आंबा आवडतो… आंबा खायला खूप रसदार असल्याने उन्हाळ्यात आपण आंब्याची वाट आतुरतेनं पाहत असतो. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आंबा खाणं योग्य आहे का? त्याचे शरीरावर काय परिणाम होतील हे तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का?? चला तर मग आम्ही सांगतो….
आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात असेल तरच तुम्ही आंबा खावा नाहीतर आंबा खाणे पूर्णपणे टाळावे. मात्र जर तुम्ही मर्यादित आणि कमी प्रमाणात आंबा खाल्ला तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. परंतु मनावर कंट्रोल करत थोड्या प्रमाणातच आंबा खावा, शक्यतो मधुमेही रुग्णांनी रोज अर्ध्यापेक्षा जास्त आंबा खाणे टाळावे… आंबा खात असताना त्यामध्ये किती प्रमाणात गोडवा आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे. काही आंब्यांमध्ये इतर आंब्यांपेक्षा कमी गोडवा असतो, तर काहींमध्ये जास्त असतो. त्यामुळे मधुमेह रूग्णांनी त्यानुसार आंबे खावे. ,मात्र ज्या लोकांची शुगर लेव्हल खूप हाय लेव्हलला आहे त्यांनी आंबा न खाणे कधीही चांगलं.
एकवेळ मधुमेह रुग्णांनी मर्यादित प्रमाणात आंबा खाल्ला तर चालेल, परंतु बाहेर कुठे गेल्यावर आंब्याच्या जूस पिऊ नका.. कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असले तरी त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाणही कमी असते. ज्या रुग्णाना किडनीचा त्रास आहे त्यांनीही आंब्याचे सेवन अतिशय मर्यादित प्रमाणात करावं. जर तुम्हाला आंबा खायचाच असेल तर मॉर्निंग वॉक नंतर, वर्कआउट केल्यानंतर आणि जेवणाच्या वेळी तुम्ही आंबा खाऊ शकता. जर तुम्ही कच्चा आंबा दही किंवा भातासोबत खाल्ला तर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते आणि याचा तुम्हाला फायदाच होईल.