हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपणही मोठं होऊन एखादी MPSC ची परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू व्हायचं असं प्रत्येकाला वाटत. मात्र, ती इच्छा काहींचीच पूर्ण होते. असेच दोनवेळा अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवण्याची कामगिरी दीक्षा जोशी हिने केली आहे. आपण एक आदर्श अधिकारी दीक्षा जोशी हिच्या यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत हि जिने परीक्षेत दोनवेळा अपयश आले तरी न खचता तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं आहे.
पहिल्या दोन प्रयत्नात अपयश, तिसऱ्यांदा यश
दीक्षाने मल्लिकार्जुन कॉलेजमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने जॉलीग्रांट येथील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून MBBS पूर्ण केले. मात्र, लहानपणापासून नागरी सेवांमध्ये नोकरी करण्याचे तिचे स्वप्न होते. यामुळेच इंटर्नशिपनंतर तिने UPSC ची नागरी सेवा परीक्षा दिली. जिद्दीने प्रयत्न करूनही पहिल्या दोन प्रयत्नात तिची निवड झाली नाही. मात्र, तिसर्या प्रयत्नात तिला यश आले आणि तिने यावेळी संपूर्ण भारतातून 19 वा क्रमांक मिळवला.
अभ्यासाचे वापरले तंत्र
दीक्षा ही मूळची पिथौरागढ, उत्तराखंडची आहे. दिक्षा जोशी हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 19 वा क्रमांक मिळाला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे तिच्यासाठी सोपे नव्हते. पण योग्य रणनीती आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली.
7 ते 8 तास केला अभ्यास
दीक्षाला पहिल्या 2 प्रयत्नात यश मिळाले नाही. तिने कोचिंग क्लासमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे तिला अभ्यास करता आला नाही. त्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहिला. यामुळेच तिनी सेल्फ स्टडीवर भर दिला. दीक्षा दररोज 7 ते 8 तास अभ्यास करायची. यावेळी तीने अभ्यासक्रमाची विभागणी केली आणि त्यानुसार परीक्षेची तयारी केली.
दीक्षाच्या यशाचा खरा मंत्र
दीक्षाने यश मिळवण्यासाठी जे सूत्र वापरले त्याबद्दल ती म्हणते की, जर उमेदवारांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायची असेल, तर सर्वप्रथम त्यांना स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण अनेक वेळा आत्मविश्वास ढासळल्याने परीक्षा देताना गडबड होते. अशावेळी उमेदवारांनी स्वत:ची ताकद आणि कमकुवतपणा देखील ओळखला पाहिजे. जेणेकरून आपल्याला कोणत्या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, हे कळू शकेल. तसेच उमेदवारांनी स्वतःची इतरांशी तुलना करू नये. कारण यामुळे गोंधळ होवून परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.