पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । आमदार दिलीप सोपल यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणातील फर्डा वक्ता अशी आहे. आपली संपूर्ण हयात राष्ट्रवादी पक्षाची सेवा करण्यात घालवलेल्या दिलीप सोपल यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून हातात शिवबंधन बांधलं आहे. सोपल यांच्या जाण्याने सोलापूरमधील, विशेषतः बार्शीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. अशातच शरद पवार यांनी बार्शीमध्ये सभा घेऊन सोपल यांच्यावर टीका केली होती.

या टीकेनंतर सोपल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र सोपल यांनी, “आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे असं म्हणतं पवारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर घेतला. शरद पवार आजही आपल्याला आदरणीय आहेत असं म्हणत असताना मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार राजा राऊत यांची खिल्ली उडवायला मात्र ते विसरले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here