55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वळसे पाटलांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुंबईसह राज्यातीळ इतर शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. अशात लोकांना मास्क लावण्याबाबत सांगत त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील वय झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पोलीस दलात 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिली.

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील वाढत असलेल्या कोरोना स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील पोलिसांच्या कोरोनातील सुरक्षेबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 55 वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना घरुन काम करण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या विळख्यात सर्वच स्थरातील लोक अडकत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या 230 डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सच वेगाने बाधित होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशात पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याने राज्य सरकारच्यावतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment