हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज दिंडोशी कोर्टाकडून त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला. राणे पिता-पुत्रांना येत्या 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले.
केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिशा सालीयनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी राणे पितापुत्रांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान या प्रकरणी राणे पितापुत्रांनी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर दोघांनीही वेळ वाढवून मागितली होती. मात्र, आज दिंडोशी कोर्टाकडून त्यांच्याबाबत आज निर्णय देण्यात आला. राणे पिता-पुत्रांना येत्या 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले.
काय म्हणाले होते राणे?
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं. आज परत महापौरांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीची बदनामी करू नका, अशी विनंती केली. तसेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली.