हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आपल्या खेळीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मागच्या काही वर्षांपासून तो आपल्या फॉर्मसाठी संघर्ष करताना दिसत होता. मात्र तो नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप आणि टी – 20 वर्ल्डकपमध्ये जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. यादरम्यान टीम इंडियाचा विकटेकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने (dinesh karthik) टीमच्या एका फलंदाजाला तो भारताचा पुढचा विराट कोहली बनू शकतो असा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या खेळाडूबद्दल….
दिनेश कार्तिकने (dinesh karthik) भावी विराट कोहली म्हणून संबोधलेल्या खेळाडूचे नाव आहे श्रेयस अय्यर. “मागच्या काही काळापासून श्रेयसच प्रदर्शन तुम्ही पाहिलं असेल. त्यातून त्याचा आत्मविश्वास दिसतो. यावर्षी त्याने 700 पेक्षा जास्त धावा केल्यात. तो आधी विकेटवर सेट होण्याचा प्रयत्न करतो. श्रेयस स्पिन गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करतो. तो प्रत्येक सामन्यात चांगल प्रदर्शन करताना दिसत आहे असे दिनेश कार्तिक (dinesh karthik) यावेळी म्हणाला.
शानदार फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू
यावर्षी श्रेयस अय्यर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने वर्ष 2022 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 721 धावा केल्या आहेत. यावर्षी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याने केल्या आहेत.
हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…