हॉलिवूडच्या प्रसिद्ध हॉरर चित्रपट दिग्दर्शकाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक जॉन लाफिया यांचा नुकताच मृत्यू झाला आहे.जॉन हे ६३ वर्षांचे होते.variety.com या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी २९ एप्रिल रोजी आत्महत्या केली आहे. लॉस एंजेलिस कंट्री कॉर्नर या ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे.

स्टिफन किंग,अ‍ॅल्फेड हिचकॉक, जॉर्ज रोमेरो,यांसारख्या दिग्दर्शकांच्या पावलांवर पाउल ठेवत जॉन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जॉन हे देखील हॉरर चित्रपटांसाठीच प्रसिद्ध होते.त्यांनी आजवर ‘द रॅट्स’, ‘मॅन्स बेस्ट फ्रेंड्स’, ‘चाईल्ड प्ले’, ‘मॉन्स्टर’ यांसारख्या अनेक सुपरहिट हॉरर चित्रटांच्या पटकथा लिहिल्या आहेत.

John Lafia Dead: 'Child's Play' Co-Screenwriter Was 63 – Variety

ते खऱ्या अर्थाने ‘चाईल्ड प्ले २’ या चित्रपटामुळे प्रकशी झोतात आले होते. ‘चाईल्ड प्ले’ या हॉरर चित्रपट मालिकेतील हा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. १९९० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याकाळी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जवळपास ३.५८ कोटी अमेरिकी डॉलर्सचा व्यायसाय केला होता. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण हॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.त्यांच्या चाहत्यांनीही त्यांना सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.