औरंगाबाद शहरात ‘CBI’ छापेमारीच्या चर्चेला उधाण; पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही

CBI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | आज सकाळपासून शहरात अनेक ठिकाणी सीबीआयच्या पथकाने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आशा कारवाई बाबत कोणतीही माहिती नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारवाई झाली की नाही हे दुपारपर्यंत गुलदस्त्यातच होते.

आज सकाळपासून अनेक व्हाट्सअप ग्रुपवर सीबीआयच्या पथकाने औरंगाबादेत छापेमारी केली व एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची पोस्ट फिरत होती. या नंतर शहरात व्यापारी, अधिकारी, राजकीय नेते मंडळीमध्ये सीबीआय छापेमारीबाबत चर्चेना उधाण आले होते.

या प्रकरणी पोलीस उपायुक्त (प्रशासन) मीना मकवाना व पोलीस उपायुक्त (झोन क्र-1) निकेश खटमोडे यांना या कथित कारवाई बाबत विचारणा केली असता सीबीआय छापमारी बाबतची कुठलीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले.