माणुसकीला काळीमा! 5 वर्षीय चिमुकलीवर 17 वर्षीय युवकाकडून अत्याचार

0
92
rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद – एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला शॅम्पू आणून दे असे सांगून घरात बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. ही घटना जिल्ह्यातील अजिंठा येथील इंदिरा नगर झोपडपट्टी मध्ये शनिवारी घडली. अजिंठा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीवर रुग्णालयात वैधकीय तपासणी सुरू होती.
याविषयी अधिक माहिती अशी की, पाच वर्षीय चिमुकली व आरोपी दोघेही शेजारी-शेजारीच राहतात. आरोपीच्या घरातील सर्व सदस्य कामा निमित्त बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधून आरोपीने घरा शेजारी राहणाऱ्या चिमुकलीला तिच्या आई समोर शॅम्पू आणण्यासाठी बोलावले. तिने शॅम्पू आणून दिल्यावर आरोपीने घराचे दार लावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी किंकाळत असताना ही त्याला तिची कीव आली नाही. मुलीच्या आईला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला तिने लगेच दार ठोठावला पण आरोपीने बराचवेळ दार उघडले नाही.व मुलीला त्याच अवस्थेत सोडून मागील दारातून आरोपी पसार झाला. ती चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. त्या नंतर मुलीचे आई- वडील व नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात मुलगी व मुलाचे मेडिकल करण्यात आले. त्या नंतर दोघांना पुढील मेडिकल व डीएनए साठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, पोलीस निरीक्षक अजीत विसपुते, अक्रम पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here