हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : OTT कडे असलेला लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन आजकाल अनेक चित्रपट निर्माते आपला चित्रपट थिएटर ऐवजी OTT वर प्रदर्शित करत आहेत. फक्त चित्रपटच नाही तर वेब सिरीज आणि टीव्ही कार्यक्रम देखील OTT वरच पाहिले जात आहेत. याशिवाय OTT वर क्रिकेट मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पहायला मिळते. आजकाल प्रेक्षकांना बॉलीवूड ते हॉलिवूडपर्यंतचे चित्रपट Disney+ Hotstar वर पाहायला आवडतात. म्हणूनच ते त्याचे सब्सक्रिप्शन घेतात.
मात्र काही अशीही लोकं आहेत ज्यांनी अजूनही Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन घेतलेले नाही. तर अशा लोकांसाठी Jio हा प्रीपेड प्लॅन योग्य ठरेल. ज्यामध्ये Disney Plus Hotstar च्या फ्री सब्सक्रिप्शन बरोबरच भरपूर डेटा देखील दिला जातो आहे. या प्लॅनची खास गोष्ट अशी कि, याची किंमत 600 रुपयांपेक्षा कमी आहे.
90 दिवसांचे फ्री सब्सक्रिप्शन
जिओच्या 583 रुपये किंमत असलेल्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांपर्यंत आहे. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसहित डेली फ्री 100 एसएमएस आणि डेली 1.5GB डेटा देखील मिळतो. Jio च्या या प्लॅनमध्ये युझर्सना OTT चे फ्रीसबस्क्रिप्शन देखील दिले जाते. या प्लॅन अंतर्गत, युझर्सना 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar Mobile फ्री सबस्क्रिप्शन मिळते. हे लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये उपलब्ध डेली FUP डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल.
अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत
ज्यांना कमी किंमतीत Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन हवे आहे अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन चांगला पर्याय ठरेल. या योजनेअंतर्गत कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता तीन महिन्यांसाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये दिलेला डेली हाय-स्पीड डेटा संपला तर युझर्सना Jio च्या 4G डेटा व्हाउचरसह रिचार्ज करता येईल, ज्याची किंमत फक्त 15 रुपये असेल.
अशा प्रकारे OTT सबस्क्रिप्शनमध्ये लॉग इन करा
Jio चे Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी युझर्सना आपल्या स्मार्टफोनवर Disney+ Hotstar App डाउनलोड करावे लागेल. यानंतर App वर जिओ नंबरने लॉग इन करावे लागेल. यानंतर OTT बेनिफिट्स मिळतील.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/
हे पण वाचा :
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Nora Fatehi ची दिल्ली पोलिसांकडून 5 तास चौकशी
England Tour of Pakistan : 17 वर्षांनंतर इंग्लिश क्रिकेट संघ पाकिस्तानात, PCB ने शेअर केले फोटो
Bank of Baroda च्या ग्राहकांना आता FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा
‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न
PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा