औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २१ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून अदालत रोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली.
शेतकी मतदारसंघाच्या औरंगाबाद तालुक्याचे व प्रोसेसिंग मतदारसंघाचे मतदान क्रांती चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात होईल. नॉन अॅग्रीचे मतदानही येथेच होणार आहे. खुलताबाद तालुक्याचे मतदान सहायक निबंधक मंगल विश्व कॉम्प्लेक्स, खुलताबाद येथे होईल. फुलंब्री तालुक्याचे मतदान सहायक निबंधक, सहकारी संस्था फुलंब्रीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे होईल. सिल्लोड तालुक्याचे मतदान सहायक निबंधक कार्यालय येथे होईल.
सोयगाव तालुक्याचे मतदान बचत भवन, पंचायत समिती येथे होईल कन्नड तालुक्याचे मतदान सहायक निबंधक सहकारी संस्था पिशोर नाका येथे होईल. पैठण तालुक्याचे मतदान मार्केट यार्डातील सहायक निबंधक कार्यालयात तर गंगापूर तालुक्याचे मतदान शिवाजी चौकातील सहायक निबंधक कार्यालयात व वैजापूर तालुक्याचे मतदान सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.