सातारा | जिल्ह्यातील विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या करणाऱ्यात वयाची चाळीशी पार केलेले एकाचाही समावेश नाही. त्यामुळे ऐन तारूण्यात टोकाचे पाऊल तरूण दिसत आहेत. समाजात अत्यंत चितेंचा विषय बनत असलेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पाच जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.
या आत्महत्येत गणपत कणसे (वय- 35. रा. विहे, पाटण), सुमित गायकवाड (वय- 28, रा. वडगाव हवेली, कराड), अमोल पाटील (वय -37, रा. सुपने, कराड), अक्षय इंगवले (वय – 27, रा. किडगाव, सातारा) आणि पोपट ढेडे (वय- 40. रा. वाई, भुईंज) अशी आत्महत्या केलेल्या पाच जणांची नावे आहेत.
आत्महत्या करणाऱ्या पाचही जणांनी कौटुंबीक वाद आणि आजारपणामुळे आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे. पाच जणांपैकी 3 जण कराड तालुक्यातील आहेत. तरूणांनी आत्महत्या केल्याने कुटुंबाच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर समाजातील तरूणांच्या या आत्महत्यामुळे सामाजिक स्वास्थ, तरूणांच्यातील चिंता याविषयीचा प्रश्न चर्चिला जावू लागला आहे.