पानिपत : वृत्तसंस्था – पानिपत या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एक शिक्षिका क्लासला येणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन फरार झाली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि शिक्षिका सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद असल्याने घरीच क्लास घेते. या शिक्षिकेचा घटस्फोट झाला असून ती आपल्या माहेरीच राहत होती.
या मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले कि 17 वर्षीय मुलगा नेहमीप्रमाणे 29 मे रोजी दुपारी दोन वाजता महिला शिक्षिकेच्या घरी क्लाससाठी गेला होता. मात्र, त्यानंतर तो परत आलाच नाही. मुलाच्या घरच्यांनी त्याची बराच वेळ वाट पाहिली मात्र, तो आला नाही. त्यानंतर त्या मुलाच्या घरच्यांनी शिक्षिकेच्या घरी चौकशी केली. तेव्हा शिक्षिकेच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी त्या महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच ती महिला आणि तो मुलगा यांचे फोनदेखील स्वीचऑफ लागत आहे.
हा अल्पवयीन मुलगा गेल्या दोन वर्षांपासून या महिला शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात आहे. सध्या राज्यात कोरोना असल्याने राज्यातील शाळा बंद आहेत. यामुळे हा मुलगा त्या शिक्षिकेच्या घरी दररोज चार तास क्लासला जात होता. यानंतर हे दोघेही 29 मे रोजी बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे या दोघांकडेही मौल्यवान अशा कोणत्याही वस्तू किंवा पैसे नाहीत. केवळ महिला शिक्षिकेच्या हातात सोन्याची अंगठी आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.