हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकता कपूरच्या ‘नागिन ३’ या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेला लोकप्रिय अभिनेता पर्ल व्ही पुरी याला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ४ जून २०२१ रोजी पर्लला IPC कलम CR IPC ३७६AB, R\w पोस्को कायदा ४,८,१२,१९ आणि २१ अंतर्गत अटक झाल्यानंतर इंडस्ट्रीतून विविध प्रतिक्रिया उमटल्या. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. टी सिरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी तसेच अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने आता पर्लसाठी समर्थन दर्शविले आहे.
https://www.instagram.com/p/CP0Nz0jnQw-/?utm_source=ig_web_copy_link
यात तिने स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे. दिव्याने सोशल मीडियावर पीडितेची आणि तिच्या आई वडिलांची ओळख सर्वांसमोर उघड केली आहे आणि कायद्यानुसार एखाद्या बलात्कार पीडितेची आणि तिझ्याशी निगडीत असणारी कोणतीही माहिती सर्वांसमोर आणणे हा गुन्हा आहे. यासोबत दिव्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने समर्थनार्थ वक्तव्य केले आहे आणि यामुळे दिव्या चांगलीच अडचणीत सापडली आहे.
https://www.instagram.com/p/CL6FN5_nqQ6/?utm_source=ig_web_copy_link
दिव्याने काही दिवसांपूर्वी पर्ल सोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले होते. या दोघांचीही जोडी लोकांना खूपच आवडली होती. त्यामुळे पर्लला पाठिंबा देत दिव्याने लिहले की,” अत्यंत लज्जास्पद आणि आश्चर्यकारक घटना आहे. चला त्यांची ओळख करुन देते. ही अभिनेत्री आहे आणि सोबत हा व्यक्ती आहे ज्याने पर्ल वर ५ वर्षाच्या मुलीवर छेडछाड केली असल्याचे आरोप लावले आहेत. या दोघांची कोर्टात मुलीच्या कस्टडी संदर्भात केस सुरू आहे. गेल्या काही वर्षापासून मुलगी आपल्या वडिलांसोबत राहत आहे. कारण त्याने पत्नीवर आरोप लावले आहेत की मुलीला सेट वर घेऊन गेली होती. जिथे पर्लने त्या मुलीसोबत गैरव्यवहार केला. मुलगी आईसोबत सुरक्षित नाहीये. मला असं वाटत आहे.
https://www.instagram.com/p/CONxQWCHCQU/?utm_source=ig_web_copy_link
पुढे म्हणाली, या माणसाला फिल्मफेयरचा बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड द्यायला हवा. पोलिसांनी पर्लला अटक केली आहे. मला जाणून घ्यायचं आहे की २०१९ मध्ये जेव्हा एफआयआरची नोंद झाली होती, त्याच वेळेस अटक का नाही केली. एफआयआर मध्ये लिहले आहे, की मुलीसोबत जेव्हा छेडछाड झाली तेव्हा ती आई सोबत होती. पर्ल पुर्णपणे निर्दोष आहे.” अश्या आशयाची एक भली मोठी पोस्ट लिहून दिव्याने पीडितेची माहिती समोर आणली आहे.
https://www.instagram.com/p/CNVAj2KH27E/?utm_source=ig_web_copy_link
दिव्याने पीडितेची माहिती सर्वांसमोर प्रकट केल्याने नेटकरीसुद्धा चकित झाले आहे. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. कायद्यानुसार एखाद्या बलात्कार पीडितेची आणि तिझ्याशी निगडीत असणारी कोणतीही माहिती सर्वांसमोर प्रकट करणे हा अत्यंत गंभीर व दंडनीय अपराध आहे. असे केल्यास त्या व्यक्तीवर आयपीसी कलम २२८ – अ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच त्या व्यक्तिला २ वर्षाची अटक होऊ शकते. यामुळे दिव्या आता चांगलीच अडकणार आहे हे निश्चित आहे.