Jio recharge Plan : रिलायन्स जिओ बाजारत अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन तसेच ऑफर्स आंत असते. याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा ग्राहक घेत असतात. अगदी कमी किमतीपासून ते खूप महागडे असे Jio चे रिचार्ज प्लॅन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही कमी पैशात दररोज मिळेल 2GB डेटा, मोफत OTT आणि 5G स्पीड मिळवू शकता.
तसे पाहिलं तर रिलायन्स जिओ वेळोवेळी बाजारात प्रीपेड प्लॅन घेऊन येत असते. कंपनीने काही काळासाठी OTT सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करणे बंद केले होते, परंतु पुन्हा एकदा OTT सेवांचे फायदे अनेक जिओ प्लॅनसह उपलब्ध होत आहेत.
जर तुम्ही दररोज डेटा, एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह सर्वोत्तम मूल्याचा Jio प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर तुम्ही अशा प्लॅनमध्ये मोफत OTT सेवांचाही आनंद घेऊ शकता. आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत तो 84 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि रिचार्जिंगच्या बाबतीत अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील देतो.
जिओच्या व्हॅल्यू ओटीटी प्लॅनमधील फायदे जाणून घ्या
रिलायन्स जिओच्या व्हॅल्यू प्लॅनची किंमत 909 रुपये आहे आणि त्याची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यास यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो. अशा प्रकारे प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा मिळतो. हा दैनंदिन डेटा संपुष्टात आल्यास, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याचा आणि Jio अॅप्स (जसे की JioTV, JioCinema आणि JioCloud) मध्ये एन्ट्री करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या प्लानसोबत Sony LIV आणि ZEE5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. हे सबस्क्रिप्शन वैधता कालावधीसाठी देखील उपलब्ध आहे.
तुम्हाला अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल
जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे Jio ची 5G सेवा सुरू झाली आहे आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन आहे, तर तुम्ही या प्लॅनसह रिचार्ज केल्यास तुम्हाला अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला दैनंदिन डेटाची काळजी करण्याची गरज नाही. कंपनी 239 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या सर्व प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे. अशा प्रकारे तुमच्यासाठी हे उत्तम प्लॅन आहेत.