#HppyDiwali | महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळेच राज्यातील प्रत्येक भागात विविध सणात निरनिराळे पदार्थ पाहायला मिळतात. त्यात दिवाळी म्हटले की, तर विचारू नका! आज आपण अशीच एक खास दिवाळी फराळ रेसिपी बघणार आहोत. तो म्हणजे ‘ढेबऱ्या’ हा पदार्थ मूळचा ठाणे जिल्ह्यात बनवला जातो. ठाणे जिल्हात भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळं या भागात वर्षभर तांदळाचे विविध पदार्थ बनविले जातात. अनेक ग्रामीण भागातही सकाळची न्याहारी म्हणूनही ढेबऱ्याच बनवल्या जात. गणपतीनंतर भात कापणीला सुरुवात होते आणि दिवाळीच्या काही दिवसांआधी घरात धान्य येते. पूर्वी दिवाळीच्या दिवशीही याच ढेबऱ्या पदार्थ केला जायचा. या दिवसांत घरात शेतमजुरांची वर्दळ असायची. ‘ढेबऱ्या’ हा पदार्थ या मजुरांचा खास आवडीचा होता. पणं जसजसं शेतीचं प्रमाण कमी होत गेलं, तसा हा पदार्थही गायब झाला. आता तो बनवला जातं नाही.
साहित्यः तांदळाचे पीठ, गूळ, छोटा चमचा तूप (मोहनासाठी), तेल तळण्यासाठी.
कृतीः प्रथम एक वाटी पाण्यात अर्धी वाटी गूळ घालून ते गरम करावे. पाणी गरम होताना त्यात एक चमचा तूप अथवा तेल घालावे. या पाण्यात मावेल एवढे तांदळाचे पीठ (पुरीचे पीठ भिजवतो तसे जरा घट्ट) भिजवावे. त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून तळाव्यात. ढेबऱ्या तयार.