हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Smartphone वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आजकाल स्मार्टफोनच्या बॅटरीमधील स्फोटाच्या अनेक घटना देखील पहायला मिळत आहेत. मात्र यासाठी थोड्याफार प्रमाणात आपणही जबाबदार आहोत. कारण दररोजच्या जीवनात मोबाईलचा नीट वापर न केल्यामुळे अशा घटना घडत असतात. दररोज नकळतपणे आपण अशा अनेक चुका करत असतो ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. जर आपणही मोबाईल फोन वापरत असाल तर हा धोका कसा कमी करता येईल याबाबतची माहिती जाणून घेउयात…
फोन रात्रभर चार्जिंगला लावणे
Smartphone वापरताना लक्षात घ्यायची सर्वात महत्वाची गोष्ट अशी कि, तो कधीही रात्रभर चार्जिंगला ठेवू नये. जर आपण असे करत असाल तर आजच ही सवय बंद करा. कारण ओव्हर चार्जिंग करण्यामुळे बॅटरी ब्लास्ट होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
ओरिजनल चार्जर न वापरणे
जर आपण Smartphone चार्ज करणार असाल तर तो त्याच्या बॉक्समध्ये देण्यात आलेल्या ओरिजनल चार्जरनेच चार्ज करा. आपला फोन कधीही स्थानिक किंवा इतर ब्रँड चार्जरने चार्ज करू नये. तसेच जर आपल्या स्मार्टफोनसाठी चार्जर घेणार असाल तर त्याचे व्होल्टेज आणि करंट याची योग्य माहिती घ्या.
चार्जिंग करताना फोनचा वापर करणे
आपला Smartphone चार्जिंगवर ठेवून कधीही गेम खेळू नका किंवा चित्रपट पाहू नका. आपल्यातील अनेकांना फोन चार्जिंगला लावून कॉल करण्याची सवय असते. हे लक्षात घ्या कि, फोन चार्जिंग करताना गेम खेळणे किंवा चित्रपट पाहणे यामुळे बॅटरीवर जास्त दबाव येतो ज्यामुळे त्यामध्ये स्फोट होण्याचा धोका वाढतो.
बॅटरी पूर्ण भरल्यानंतरही फोन वापरणे
जर आपल्या Smartphone ची बॅटरी फुगली असेल तर याचा अर्थ ती खराब झाली आहे, अशा स्थितीत आपला फोन चार्जिंगवर ठेवल्याने त्यामध्ये स्फोट होण्याचा धोका वाढतो.
हे पण वाचा :
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा