ATM मधून cash काढताना करा ‘हे’ छोटेसे काम, जेणेकरून तुमचे बँक खाते राहील सुरक्षित; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । आरबीआय बँक सातत्याने सामान्य लोकांचे पैसे खात्यात सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलत आहेत. अलीकडेच आरबीआयने डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. परंतु आपली सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे खबरदारी ठेवणे हि आहे. होय, एक छोटीशी लाईटही आपले बँक खाते रिकामे करू शकते. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

ग्रीन लाईट पाहणे का महत्वाचे आहे – जेव्हा आपण ATM मध्ये जाता तेव्हा ATM मशीनच्या कार्ड स्लॉटकडे काळजीपूर्वक पहा. एटीएम कार्ड स्लॉटमध्ये एखादी छेडछाड झाल्याचे आपल्याला वाटत असल्यास किंवा स्लॉट सैल झाला असेल किंवा काहीतरी वेगळं दिसत असेल तर ते वापरू नका.

या कार्ड स्लॉटमध्ये कार्ड ठेवताना त्यात चालू असलेल्या लाईटकडे लक्ष द्या. जर स्लॉटमध्ये ग्रीन लाइट चालू असेल तर ते एटीएम सुरक्षित असेल. परंतु त्यामध्ये जर लाल किंवा कोणतीही लाईट चालू नसल्यास ते ATM वापरू नका. यामध्ये मोठी गडबडी असू शकेल. कारण, ATM मशीन पूर्णपणे दुरुस्त केल्यावरच ग्रीन लाईट चालू राहते.

खाते रिकामे होऊ शकते – ATM मशीनमधील कार्ड स्लॉटमधून हॅकर्स कोणत्याही युझर्सचा डेटा चोरतात. त्यांनी एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असे डिव्हाइस ठेवले असेल जे आपल्या कार्डबद्दल सर्व माहिती स्कॅन करते. यानंतर, ते ब्लूटुथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस डिव्हाइसमधून आपला डेटा चोरी करतात आणि बँक खाते रिकामे करतात.

जर आपल्याला असे वाटत असेल की, आपण हॅकर्सच्या जाळ्यात अडकले आहात आणि बँका देखील बंद आहेत तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. कारण तेथे आपल्याला हॅकरच्या फिंगरप्रिंट्स आढळतील. तसेच, आपल्याभोवती कोणाचे ब्लूटूथ कनेक्शन कार्यरत आहे का हे आपण देखील पाहू शकता. याद्वारे आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता.

आपल्या डेबिट कार्डचा एक्सेस घेण्यासाठी, हॅकर्सकडे आपला पिन नंबर असणे आवश्यक आहे. हॅकर्स कॅमेर्‍याद्वारे आपला पिन नंबर ट्रॅक करू शकतात. हे टाळण्यासाठी जेव्हा आपण ATM मध्ये आपला पिन नंबर टाकता तेव्हा दुसर्‍या हाताने तो लपवा. जेणेकरून ते सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये पहिले जाऊ नये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.