हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील खासदार लारिसा वॉटर्स यांनी आपल्याला बाळाला संसदेत अधिवेशन चालू असताना बाटलीने दूध पाजले होते. त्यामुळे त्यावर अनेकांनी महिलांच्या सुरक्षितेबाबत तसेच पाळणाघराबाबत अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. असं तुम्हीही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजता का? बाळाचा जन्म झाल्यावर डॉक्टर असं सांगतात की, आईचे दूध हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. आईचे दूध हे बाळाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी त्यास सक्षम बनवते. असे आपण ऐकतो. परंतु अनेक स्त्रिया नोकरी न करतासुद्धा बाळाला बाटलीने दूध पाजतात. हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते. ते कसे ते पाहू.
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले की, फॉर्म्युला दूध तयार करणारी 85 टक्के यंत्रे ही हानिकारक बॅक्टेरीया मारण्यास सक्षम नाहीत. ज्या बालकांना फॉर्म्युला दूध म्हणजेच बाटलीतील दूध पाजलं जात आहे त्यांना या दुधातील बॅक्टेरीयामुळं संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो.एवढेच नाही तर बाळाला जेव्हा तुम्ही बाटलीने दूध पाजता तेव्हा बाळ केवळ ते चोखण्यासाठी वापर करतात. त्यामुळे त्यांचे पोट पुरेपूर भरत नाही. आणि सततच्या हवा चोखण्यामुळे बाळाचे पोटही दुखू शकते.
तसेच बाटलीतून दूध देताना ती सध्या पाण्याने न धुता ती गरम पाण्याने धुतलेली हवी. बाटली जर खूप वेळेपर्यंत उघडी असेल तर त्याचा परिणाम हा हानीकारक होऊ शकतो. बाटली उघडी राहिल्यामुळे त्यावरून सुक्ष्म जीव निर्माण होऊ शकतात आणि परिणामी बाळाला जुलाब होऊ शकतात. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं कमी आईने बाळाला बाटलीतुन दूध पाजावे.
दरम्यान नवजात बाळाला कधीपर्यंत दूध पाजावे असाही प्रश्न एका आईला पडणे साहजिक आहे. आईने बाळाला 6 महिन्यापर्यंत केवळ तिचेच दूध पाजावे. जर समजा कोणत्या आईला काही कारणास्तव दूध येत नसेल तर बाळाला बॉटल किंवा चमच्याने दूध पाजायला सुरुवात करावी. मात्र त्या बॉटल मध्ये दूध हे आईचेच असायला हवे. जन्मापासून पुढील सहा महिने अजिबात बाळाला आईच्या दुधाशिवाय अन्य काहीही देऊ नये. असे केल्यास बाळाचे आरोग्य बिघडू शकते. आणी परिणामी बाळ भविष्यात विविध आजारांना बळी पडते. बाळाला तुम्ही जर बाटलीतुन दूध पाजत असाल तर त्यास सुरुवातीला 30 ते 60 मिली एवढेच प्रमाण ठेऊन दूध द्यावे. आणि त्यांनतर हळू हळू एक महिन्यात त्यास 120 मिली एवढे प्रमाण करावे.