तुम्ही सुद्धा जेवताना पाणी पिता? वेळी सावध व्हा, अन्यथा…

Drinking water while eating
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर पाणी (Water) म्हणजे जीवन, निरोगी आयुष्यसाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड (Hydrated) राहतेच, याशिवाय आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. त्यामुळे डॉक्टर सुद्धा आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र कधी कधी आपण चुकीच्या वेळी पाणी पितो. उदाहरणार्थ जेवत असताना पाणी पिणे ही एक चुकीची सवय आहे, यामुळे आपल्याला नुकसान होण्याची शक्यता असून तुम्ही सुद्धा असं करत असाल तर वेळीच सावध व्हा….

जेवण करताना पाणी प्यायल्यास त्याचा आपल्या पचनक्रियेवर (Digestion) परिणाम होतो. जेव्हा आपण अन्न खात असतो तेव्हा आपली पचन प्रक्रिया सुरू होते, अशा वेळी तुम्ही जर मध्येच पाणी प्यायलात तर पचन प्रक्रियेत अडथळा येतो. यामुळे तुम्ही खाल्लेले अन्नही शरीराला नीट पचत नाही. त्यामुळे शक्यतो जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

याशिवाय जर तुम्ही जेवत जेवतच पाणी पीत असाल तर त्यामुळे पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते, आणि अनेकदा तुम्हांला आंबट ढेकर येऊ शकतात . या समस्येला ॲसिड रिफ्लेक्स (Acid reflex) म्हणतात. एवढेच नव्हे तर जेवत जेवत पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

जेवत जेवत पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हांला लठ्ठपणाचा (obesity) सामना करावा लागू शकतो. जेवताना पाणी पिल्याने अन्न नीट पचत नाही. त्यामुळेच पोटातील चरबी हळूहळू वाढू लागते आणि व्यक्ती लठ्ठपणाची शिकार बनते. जेवताना सातत्याने पाणी पिल्याने पोट लगेच भरते मात्र काही वेळांनंतर पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते.