हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा एकाच वेळी जास्त वेळ बसल्याने आपले पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण आहे. आज आपण जाणून घेऊया हाता पायाला मुंग्या येण्याची नेमकी कारणे आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याबाबत….
पायाला मुंग्या येण्याची कारणे-
कधी कधी आपण एकाच जागी खूप वेळ बसतो. यामुळे पायाच्या शीरेवर दाब येऊन तो पाय सुन्न होतो. आणि पायाला मुंग्या येतात. अनेकदा तर मांडी घालून बसल्याने पायाच्या शीरेवर दाब आल्यामुळे देखील पायाला मुंग्या येण्याची शक्यता अधिक असते.
व्हिटॅमिन बी १२ची कमतरता-
जर तुमच्या हात व पाय दोघांना सातत्याने मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता असू शकते . तसंच त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो किंवा आळसवाणे वाटेल.
मानेची नस आखडने-
मानेची नस आखडलया मुळे पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.
मधुमेह –
मधुमेह असलेल्या व्यक्तींना सुद्धा पायांना मुंग्या येतात. रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात.
काय करावे उपाय –
तुमचे शुज जर तुम्हाला घट्ट होत तर ते बदलण्याची आवश्यकता आहे. कारण पायाच्या बोटांपर्यंत रक्तपुरवठा झाला नाही तर पायाला मुंग्या येतात.
हाता-पायांना मुंग्या येण्याची समस्या सतावत असेल तर शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्या आहारात अंडी, चीज, दूध, मासे या पदार्थांचा समावेश करावा कारण या पदार्थांपासून बी १२ मिळते.
पायाला मुंग्या आल्यावर जर आपण काही पावलं चालण्याचा प्रयत्न केला, तर आपले पाय हे लवकरच पूर्ववत स्थितीत येतात.
हाता पायाला मुंग्या आल्यास गरम पाण्याचा शेक द्यावा. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढून मुंग्या जातील.