हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | Covid 19 सारख्या महामारीने माणसाच्या जीवनाचे अनेक पैलू बदलून टाकले. बदललेल्या जीवनशैली मध्ये राहणीमान आणि आहार या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. बऱ्याच अफवा आणि गैरसमज या काळात पसरले गेले. काही मुख्य गैरसमज म्हणजे कोणता आहार घेण्यात यावा व कोणता आहार घेऊ नये. करोना ची भीती कमी झाली तसा बर्ड फ्ल्यू या रोगाने डोके वर काढले आहे. यामध्ये मांस किव्वा दूध यामधून बर्ड फ्ल्यू पसरतो का हा सुद्धा एक प्रमुख गैरसमज आहे. या काळात चिकन उत्पादनावर खूप फरक पडला. लोकांनी चिकन उत्पादन करणे थांबवले. याचा परिणाम चिकन उत्पादनावर झाला.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथील वाढत असलेल्या बर्ड फ्लू या रोगामुळे लोकांनी चिकन खाणे कमी केले आहे. पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू हा आजार श्वसनाच्या संदर्भात आहे. आणि आजार पक्षामधून माणसांमध्ये प्रसारित होऊ शकतो. यामुळे अनेक समज-गैरसमज सद्ध्या निर्माण होत आहेत.
बर्ड फ्ल्यू मध्ये चिकन खाल्ले तर काहीही त्रास होणार नाही. उलट यामधून रोगप्रतिकारक क्षमता वाढेल असे मत WHO ने व्यक्त केले. चिकन खाण्या अगोदर फ्रेश चिकन स्वच्छ करून ते 70 डिग्री वरती शिजवून घेण्यात यावे आणि अंडे हे व्यवस्थित उकडून घेऊन मगच खाण्यात यावे. व्यवस्थित काळजी घेऊन बनवलेले चिकन आणि अंडी ही रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास खूप मदत करतात.
बर्ड फ्ल्यू या खाण्याच्या पदार्थांच्याबाबतीत होत असलेले गैरसमज हे केवळ गैरसमज असून त्यावर लोकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन WHO ने केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’