सर्दी- खोकल्यामुळे तुमच्याही घशात खवखवतंय? हे उपाय कराच

sore throat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा काळ असून थंडीच्या या दिवसात सर्दी, ताप आणि खोकला होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंडीचा काळ हा आव्हानांचा काळ म्हंटल तरी चालेल. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. कधी कधी सर्दी, खोकल्यामुळे घशात खवखवते, तुम्हालाही हा त्रास होत असेल तर आज आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही या समस्येवर मात करू शकतो.

tea

चहा –

आपण सर्वजण चहाचे तर नक्कीच शौकीन असतो. थंडीच्या दिवसात चहा प्यायल्याने सर्दीपासून सुटका तर मिळतेच याशिवाय जर तुम्हाला घशात दुखत असेल तर चहा या समस्येवर नक्कीच मार्ग काढू शकतो. यासाठी चहामध्ये तुम्हाला आले आणि काळी मिरी घालावी लागेल. हा चहा पिल्याने तुमच्या घशातील वेदना दूर होतील. यासोबतच तुमच्या शरीराला उष्णताही मिळेल.

garlic

लसूण –

हिवाळ्याच्या दिवसात लसूण भरपूर प्रमाणात खावे. लसणामुळे सर्दीपासून सुटका मिळू शकते. लसुण मध्ये ऍलिसिन नावाचा घटक असतो जो एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. यामुळे घशात खवखवणारे जिवाणू मारले जातात.

ज्येष्ठमध –

घसा खवखवत असेल तर यावर ज्येष्ठमध चांगला उपाय ठरू शकतो. यासाठी ज्येष्ठमधचा तुकडा दातांच्या मध्ये ठेवा आणि हळू हळू चावताना त्याचा रस प्या. या रसामुळे तुमच्या खोकला सुद्धा दूर होतो आणि घशात खवखवायचे सुद्धा थांबते.

Smoothie

स्मूदी –

हिवाळ्यात कोल्ड स्मूदी प्यायल्याने घसा खवखवणे आणि दुखण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. स्मूदीमध्ये आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. स्मूदीमध्ये तुम्ही ताजी फळे, दलिया, आले, चिमूटभर हळद, पाणी आणि बर्फाचे तुकडे वापरू शकता.