मुंबई | पती म्हणजे एका पत्नीचे सर्वस्व! त्याला खुश ठेवण्यासाठी पत्नीचा जन्म असतो, असे आपली पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये शिकवले जाते. यामुळे पत्नीने पतीचे सर्व कामे करणे बंधनकारक आणि कर्तव्ये समजून करणे बंधनकारक असल्याचे समाजामध्ये रूढ झाले असल्याचे पाहायला मिळते. अश्यातच एखाद्या पत्नीने, पतीने सांगितलेले काम करणे नाकारले तर पती कुठल्याही थराला जाऊ शकतो. पत्नीने चहा बनवण्यास नकार दिल्यामुळे पतीने तिचा खून केल्याची घटना घडली होती. आरोपी पतीला सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर, पती हा मुंबई उच्च न्यायालयात गेला आणि उच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम ठेवत, ‘घरातील कामे ही केवळ महिलांची जबाबदारी नाही’ असे म्हणत पतीची शिक्षा कायम ठेवली आहे.
पत्नीने चहा बनवण्यास नकार दिल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीचा खून केला. व आरोपीला सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीच्या अर्जावर कुठलीही उदारता न दाखवता त्याची शिक्षा कायम ठेवली. सोबतच समाजातील इतर पितृसत्ताक मानसिकतेच्या लोकांनी संदेशही दिला आहे की कुटुंब ही दोघांची जबाबदारी आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा सन्मान ठेवून एका घरात राहावे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी हा आदेश दिला. ‘विवाह हा समांतेवर आधारित साझेदारी आहे. त्यामुळे महिला या कोणाच्या गुलाम नसून, त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे ‘. असे त्यांनी या आदेशात म्हटले आहे. 19 डिसेंबर 2013 रोजी महाराष्ट्रातील सोलापुरमधील संतोष अटकर याने, पत्नीने त्याला चहा बनवून दिला नाही म्हणून पत्नी मनिषाला हतोडीने मारले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या मनिषाला रुग्णालयात दाखल केले होते. 25 डिसेंबर 2013 रोजी मनिषाचे निधन झाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.