लैंगिक शोषण प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी; कोर्टाने दिली जबर शिक्षा

donald trump
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कोर्टाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने ट्रम्प यांना पाच लाख अमेरिकन डॉलर्सचा (४१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना जबर धक्का बसला आहे. न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणात निकाल जाहीर करत बलात्काराचा आरोप जरी फेटाळला असला तरी लैंगिक गैरवर्तनासह इतर तक्रारींसाठी ट्रम्प यांना जबाबदार धरत शिक्षा ठोठावली आहे .

काय आहे प्रकरण?

अमेरिकेतील एका मॅगझिनच्या लेखिका जीन कॅरोल यांनी 2019 मध्ये आरोप केला होता की ट्रम्प यांनी 1996 मध्ये मॅनहॅटन डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण कॅरोलला ओळखत नाही आणि तिला स्टोअरमध्ये भेटलोही नसून कॅरोल आपले पुस्तक विकण्यासाठी खोटी कथा रचत असल्याचे त्याने म्हटले होते. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना २ अन्य महिलांनीही ट्रम्प यांच्या विरोधात साक्ष दिली.

याशिवाय कॅरोलच्या दोन मित्रांनी सुद्धा याबाबत साक्ष देत म्हंटल होते की कॅरोलने त्यांना या घटनेबद्दल सांगितले होते. मात्र, ट्रम्प यांच्या भीतीने त्यांना हे कोणालाही न सांगण्यास सांगण्यात आले. कॅरोलला भीती होती की ती पुढे आली तर ट्रम्प आपल्या शक्ती आणि पैशाच्या जोरावर तिचा बदला घेतील.