हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hush Money : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते कायद्याचा कचाट्यात चांगलेच अडकल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांच्यासोबत आणखी एक मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे, तो म्हणजे हश मनी. चला तर मग Hush Money म्हणजे काय ??? आणि ट्रम्प या व्यवहारामध्ये कसे अडकले ??? तसेच.त्याच्याशी संबंधीत कायदे काय आहेत याची माहिती जाणून घेउयात…
या प्रकरणातील अधिक माहिती अशी कि, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्याला Hush Money असे म्हटले जात आहे. जर हश मनीचा अर्थ पाहायचा झाला तर ती एक प्रकारची लाचच आहे. काही प्रकरणांमध्ये त्याचा वापर ब्लॅकमेलिंग म्हणूनही केला गेला आला आहे. तसेच एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी दिलेली रक्कमही हश मनी मानली गेली आहे.
या प्रकरणांमध्ये वापरली जाते Hush Money
Hush Money हा शब्द लाचखोरी आणि ब्लॅकमेल सारख्या कृत्यांसाठी वापरला जाऊ शकतो. मात्र त्याचा खरा अर्थ काही विशिष्ट परिस्थितीसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, कोणतेही अनैतिक किंवा बेकायदेशीर काम लपवण्यासाठी एखाद्याला दिलेल्या पैश्याला हश मनी असे म्हणतात. तसेच एखाद्या बेकायदेशीर कृत्यांबाबत तोंड बंद ठेवणे आणि त्याबद्दल जाहीरपणे काहीही उघड न करण्याच्या हेतूने दिलेल्या पैशालाहीह श मनी असे म्हंटले जाते.
Hush Money बेकायदेशीर आहे का ???
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक असलेल्या पॉल शिफ बर्मन यांनी हश मनीबाबत आपली भूमिका मांडताना सांगितले कि, “हश मनी देण्याबाबत कायद्यात थेट असे काहीही सांगितले गेलेले नाही.” याचाच अर्थ असा कि हश मनीबाबत स्पष्ट असा कोणताही कायदा नाही. होय, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हश मनी देणे किंवा घेणे बेकायदेशीर ठरू शकेल. ट्रम्प यांच्या बाबतीतही, त्यांना हश मनीसाठी आरोपी केले गेलेले नाही. तर, त्यांनी चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करून पैसे उकळल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hush Money बाबत कारवाई होऊ शकते का ???
बेकायदेशीर कामासाठी, गुन्हा लपवण्यासाठी किंवा तो सार्वजनिक होण्यापासून रोखण्यासाठी दिला जाणारा हश मनी पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत आहे. अशा व्यवहारामध्ये पैसे देणारा आणि घेणारा दोघांवरही कारवाई होऊ शकते.
हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..