करोना लस घेतल्यानंतर या चुका अजिबात करू नका; WHO ने दिल्या महत्त्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | करोणा महामारीने एक वर्ष उलटूनही नमते घेतलेले नाही. हा रोग दुप्पट वेगाने आणि ताकदीने परत आला आहे. सध्या दुसऱ्या फेजमध्ये हा झपाट्याने वाढतो आहे. यावर मात करण्यासाठी भारतासह इतर देशांनीही करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. पण लस घेतल्यानंतर काही चुका होत आहेत. त्यामुळे त्याचा हवा तसा उपयोग होताना दिसून येत नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लस घेतल्यानंतर होणाऱ्या चुकीबद्दल काही महत्त्वाच्या सूचना देशांना दिल्या आहेत. व त्यांचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.

लस घेतल्यानंतर त्याचे थोडे साईड इफेक्ट होणे ही संभाव्य गोष्ट आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने निवेदनामध्ये सांगितले. या साईड इफेक्टमध्ये डोके दुखणे, ताप येणे, अंग दुखणे या गोष्टी सामान्य आहेत. या लक्षणांवरून आपले शरीर करोना प्रतिबंधक लसीला साथ देत असल्याचे निष्कर्ष निघतात. यामुळेच लस घेतल्यानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता आहे. असे WHO ने सांगितले.

यासोबतच, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, लस घेतल्यानंतर काही दिवस शरीरावर टॅटू काढू नये. त्यामुळे रिॲक्शन होऊ शकते. तर करोना लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची वेगळी लस घेऊ नये. जर दुसऱ्या प्रकारची लस घ्यायची असेल तर, त्यामध्ये आठवड्याचा कालावधी असणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर व्यायाम करणे टाळावा. मुबलक पाणी प्यावे. सोबतच लसीकरणाचे सर्टीफिकेट जपून ठेवावे. असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment