हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सकाळी आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्याला दिवसभर पहायला मिळतो. त्यामुळे सकाळी योग्य आणि उपयुक्त आहार करणं आवश्यक आहे. असे अनेक पदार्थ आहेत जे सकासकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने आपल्याला पचनाचे तसेच अन्य त्रास होऊ शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? याबाबत …
1) चहा किंवा कॉफी –
खरं तर प्रत्येकाला चहा किंवा कॉफी हवाहवासा वाटतो. परंतु सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी कधीही पिऊ नका. जर तुम्हाला चहा आणि कॉफी पिण्याची खूपच इच्छा असेल तर तर तुम्ही त्यासोबत ब्रेड किंवा बिस्किटे खावीत नाहीतर तुम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो.
2) टोमॅटो –
टोमॅटोमध्ये टॅनिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटात ऍसिडिटी होऊ शकते. यामुळे गॅस्ट्रिक अल्सर होण्याचा धोका वाढतो.
3) मसालेदार पदार्थ –
खरं तर जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या समस्यांना सामोरे जावं लागत. त्यातच जर रिकाम्या पोटी मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ले तर तुमच्या पोटाचे गंभीर नुकसान होऊ शकते. मसालेदार पदार्थांमुळे ॲसिडिक रिॲक्शन होतो आणि अपचनच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे सकाळी अंशपोटी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
4) सफरचंद –
खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला समस्या होऊ शकतात. याचे कारण म्हणजे सफरचंद पचायला १ किंवा २ तास लागतात. अशा वेळी सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो, त्यामुळे सकासकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ नये.
5) दही –
सकासकाळी रिकाम्यापोटी दही खाणे आरोग्यासाठी घटक आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे पोटातील ऍसिडिटी पातळीला बिघडवते. दुसरीकडे, रिकाम्या पोटी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे अॅसिडिटी वाढते, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर दही खाऊ नये.