हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्याच्या काळात योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे खूप अवघड आहे. कारण ज्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली जाते तिथे पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळावा, अशी लोकांची इच्छा असते. जर आपल्यालाही एखाद्या अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणुक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजने बाबत माहिती घ्या …
हे लक्षात घ्या कि, किसान विकास पत्र ही भारतीयPost Office कडून दिली जाणारी एक खास योजना आहे. याविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये कोणतीही जोखीम नाही.तसेच ही योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय देखील आहे. यामध्ये कोणताही 18 वर्ष वयावरील कोणत्याही नागरिकाला खाते उघडता येते. तसेच यामध्ये 3 लोकांच्या नावाने जॉईंट अकाउंट देखील देखील उघडता येते.
व्याजदर किती असेल ???
हे जाणून घ्या कि, लहान बचत योजनेतील व्याज हे दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक आधारावर निश्चित केले जातात. मात्र सरकार कडून किसान विकास पत्रामध्ये उपलब्ध असलेल्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केले गेलेला नाही. सध्या त्यावर वार्षिक आधारावर 6.9 टक्के दराने व्याज दिला जात आहे.
या योजनेमध्ये 1,000 रुपयांद्वारे गुंतवणूक सुरू करता येते. यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. इथे हे लक्षात घ्या कि, सध्याच्या व्याजदरानुसार या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होतील. Post Office
टॅक्स मध्ये सूट मिळेल का ???
आयकर कायदा 1961 अंतर्गत किसान विकास पत्र योजना येते. त्यामुळे यामध्ये 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळू शकेल. मात्र जर यामध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर पॅन कार्ड डिटेल्स शेअर करावे लागतील. तसेच किसान विकास पत्र योजनेद्वारे आपल्याला कर्ज देखील घेता येते. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/
हे पण वाचा :
Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेजाणून घ्या
Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, चेक देण्यापूर्वी जाणून घ्या
PM Kisan योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का ???
Cyber Froud : ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत, कसे ते जाणून घ्या
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर तपासा