हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या वाढत चालली असून याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग दुप्पट असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते
राजेश टोपे म्हणाले, ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग दुप्पट आहे. युरोपमध्ये एका दिवसाला लाख रुग्ण सापडत आहेत. आज आपली रुग्णसंख्या १०० आहे पण जर ती हजारावर गेली तर त्याचा प्रसार हा झपाट्याने वाढू शकतो. ओमिक्रोन मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जरी कमी असलं तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी
यावेळी त्यांना राज्यातील शाळांबाबत विचारलं असता तूर्त तरी शाळेच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही, शाळा आहे तशा सुरूच राहतील असे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच ज्या दिवशी ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल तेव्हाच राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल मात्र सध्या तयारी अशी परिस्थिती नाही असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं