बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांना प्रकाश आंबेडकरांनी तिलांजली दिली

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. त्यानिमित्त कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांना आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांचे विरोधी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंडसुख देखील घेतले आहे.

बाबासाहेबांच्या विचारांना आणि तत्वाला प्रकाश आंबेडकर यांनी तिलांजली दिली आहे असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. त्यांनी प्रकाश आंबेकर यांच्या सहितभाजपवर देखील  टीका केली आहे. भाजपने जातीवादाचा आधार घेत  जय सिध्देश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिली आहे असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हणाले आहे.

भाजपने पाच वर्षात सोलापूर साठी काय केले हे सांगावे. आमची सत्ता असताना आम्ही सोलापूरला विद्यापीठ आणले. उजनी धरणावरून सोलापूरला पिण्याला पाणी आणले. रस्ते  बांधले. तर  भाजपने त्यांच्या सत्तेच्या काळात नेमके काय केले याचे उत्तर त्यांच्या कडे नाही. त्यांनी सोलापूरसाठी एकही प्रकल्प आणला नाही असा टोला देखील सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला आहे.