रेल्वे आंदोलन करून राजकारण करू नका; आरोग्यमंत्री टोपेंचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून ठाकरे सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या रेलभरो आंदोलनावर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी भाजपला टोला लगावला आहे. “पंतप्रधानांनी सांगितले आहे की ‘जान है तो जहान है’. मात्र, या महामारीत भाजपकडून रेलभरो आंदोलन करून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे ते त्यांनी करू नये, असं म्हणत टोपे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलमधून प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्यावतीने आज मुंबईत रेलभरो आंदोलनही करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनामागचे खरे कारण हे राजकारण असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे. टोपे म्हणाले आहेत की, कुणालाही त्रास द्यायची आम्हाला हाऊस नाही, तर सर्व निर्णय हे टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार घेतले जात आहेत. मात्र, या गोष्टींचा विचार न करता भाजपकडून कायदा हातात घेतला जात आहे.

यावेळी डॉ. टोपे यांनी मुंबईत लोकल सुरु करण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासावर विचार सुरू आहे. योग्य नियोजन केल्यानंतरच लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू जाणार आहे. त्यामुळे भाजपने आता लोकलबाबत आंदोलन करून राजकारण करू नये.