मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसाला देशात ३ लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण सापडत आहेत. या कोरोनाच्या लाटेमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये पोलीस, पत्रकार, फ्रंटलाईन वर्कर्स यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंत्रालयातील सहसचिव संतोष भोगले यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सचिव संतोष भोगले यांच्या निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष भोगले यांनी नंदन निलेकणी यांच्या प्रमुख कल्पनेतेतून नव्यानेच सुरु झालेल्या आधार कार्डसंदर्भात राज्यातील काम पहिले आहे.
हे काम पार पाडण्यासाठी तत्कालीन माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश जैन आणि संतोष भोगले यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. डिजिटल सातबारा हे नवीन कार्य सुद्धा त्यांच्याच कामाचा एक भाग होता. संतोष भोगले हे एक उत्तम उत्कृष्ट मॅरेथॉनपटू होते. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.