हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणताही सीझन असला तरी आपल्याला शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र सध्या हिवाळ्याचे (Winter) दिवस असून जास्त थंडीमुळे अनेकदा आपल्याला तहान कमी प्रमाणात लागते. त्यामुळे साहजिकच आपण हिवाळ्यात कमी पाणी पितो. (Less Water) मात्र तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात कमी पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी मोठं नुकसानकारक ठरू शकते. कमी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहू शकत नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच त्वचाही कोरडी दिसते. त्यामुळे चला जाणून घेऊया नेमक्या कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकत …
पोट खराब होऊ शकत –
पोटातील अन्न पचवण्यासाठी पाण्याची गरज असते, पण पाणी न पिल्याने किंवा कमी प्रमाणात पिल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. तसेच पोट साफ होण्यास त्रास होतो. त्यामुळे थंडी असो वा पासून, तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
त्वचेवर कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते-
हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने त्वचेवर कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते. तसेच त्वचेवर चमकही दिसत नाही. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे त्वचाही चमकदार दिसते. पाणी कमी प्यायल्याने त्वचेवर जास्त कोरडेपणा येऊ शकतो.
किडनी स्टोनचा धोका-
पाणी कमी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही वाढतो. किडनीला व्यवस्थित काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरात पाणी कमी असते, तेव्हा किडनी पूर्ण ताकदीने काम करते, त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ होण्याच्या तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे कितीही थंडी असली तरी पाणी पिणे टाळू नका.
शरीरात थकवा येण्याची शक्यता –
हिवाळ्यात पुरेसे पाणी न पिल्याने शरीरात थकवा येण्याची समस्या उद्भवू शकते. कमी पाणी प्यायल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.