जालना : हॅलो महाराष्ट्र – जालन्यामध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. आपण सर्वानी जय वीरूचा शोले चित्रपट पाहिला असेल. त्यामध्ये जसे विरूने आपल्या बसंतीसाठी टॉवर वर चढून आंदोलन (drunk man climbs on mobile tower) केले होते. तसेच आंदोलन जालन्यातील एका दारुड्याने केले आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला पुन्हा सासरी नांदायला बोलवण्यासाठी केले आहे.
दारुड्याचे शोले स्टाईल आंदोलन; बायको सासरी येत नाही म्हणून मोबाईल टॉवरवर चढला अन्… pic.twitter.com/HyFC0ju6WJ
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 21, 2022
काय घडले नेमके ?
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. माहेरी गेलेली बायको सासरी परत नांदायला येत नसल्याने दारूड्याने थेट मोबाईल टॉवरवर चढून (drunk man climbs on mobile tower) शोले स्टाईल विरुगिरी केली आहे. बदनापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली. मात्र तरीदेखील तो खाली येत नव्हता. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाला पाचारण करून त्याला खाली उतरविण्यात आलं.
“अरे खाली ये तुला आमदार करतो”
या दारुड्याला टॉवरवरून खाली उतरविण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू (drunk man climbs on mobile tower) होते. सगळे आपल्या परीने त्याला खाली येण्याचं आवाहन करत होते. यावेळी एका ग्रामस्थाने तर “अरे खाली ये तुला आमदार करतो” असं आमिष दाखवत उपरोधिक आवाहन केले. त्यानंतर उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणात हशा पिकला. या संपूर्ण घटनेचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार