दारूच्या नशेत व्यक्ती थेट ट्रेनच्या इंजिनखाली जाऊन झोपला आणि मग…

भोपाळ : वृत्तसंस्था – दारूच्या नशेत असलेले लोक (drunk man) काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. लोक नशेत (drunk man) अनेकदा अशा चुका करतात की जेव्हा ते शुद्धीवर येतात तेव्हा त्यांनाच त्याची लाज वाटते. अलीकडेच मध्य प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर असाच काहीसा प्रकार घडला आहे. यामध्ये एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की तो स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनखालीच जाऊन झोपला. यानंतर लोकांना तिथे येऊन त्याला बाजूला काढण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे कि लोक एका व्यक्तीला (drunk man) ट्रेनच्या खालून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा व्यक्ती दारूच्या नशेत (drunk man) ट्रेनखाली जाऊन झोपला. याची माहिती मिळताच त्याला तिथून बाहेर काढण्यात आले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, “दोन पेग मारल्यावर, रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनचं इंजिन सर्व मखमली दिसतं. दृश्य ग्वाल्हेरचं आहे. सुदैवाने या व्यक्तीचा जीव वाचला.” या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रुळावर, ट्रेनच्या इंजिनखाली झोपलेला दिसतो. अनेकजण एकत्र येत त्याला बाहेर काढताना दिसत आहेत. स्वतः उठून चालण्याइतपतही तो शुद्धीवर नाही आहे. हा व्हिडिओ ग्वाल्हेर स्टेशनवरील आहे.

दारूच्या नशेत एखाद्याने असं विचित्र कृत्य केल्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली होती. यामध्ये महेंद्रगडच्या माजरा खुर्द गावात मद्यधुंद शिक्षक सरकारी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले होते. गुरुजींचं हे कृत्य पाहून कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्या शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा गुरुजींना चालताही येत नव्हते. याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल