फडणवीसांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी केंद्रीय मंत्री उतरले रस्त्यावर 

 

औरंगाबाद – शहरातील पाणी प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.

 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाडी जागा दिली जात नव्हती. यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रस्तावर उतरुन कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी भाजपचा झेंडा घेत त्याच्या काठीच्या साह्याने कार्यकर्त्यांना बाजूला करत देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला रस्ता करुन दिला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांचा औरंगाबादेत दे धक्का काम केले. रावसाहेब दानवे यांनी स्वतः मिरवणुकीच्या गाडीतून उतरून दिले कार्यकर्त्यांना पक्षाच्या झेंड्याने धक्के दिले.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यकर्त्यांना फटके दिले. फडणवीस यांच्या गाडीला रस्ता न दिल्याने रावसाहेब दानवे कार्यकर्त्यांवर भडकले.