कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्यात येऊन गेलेल्या महापुराच्या आठवणी काढल्या तरी अंगावर क्षहारे उभा राहतो. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेने कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि सोमवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कोल्हापुरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पंचगंगा नदीच्या पात्रात ३३ फुटाने वाढ झाली आहे. तसेच पंचगंगा नदीवर असणारे ५५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापुरात पाऊस पडत नसला तरी घाटमाथ्यावर पाऊस पडत असल्याने ही पूरस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.
ऑगस्टच्या पहिल्या १० दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं. घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यातून आता कुठे घरं सावरत नाहीत तर पुन्हा एकदा पुराचं सावड कोल्हापूरकरांवर आहे. सुरक्षेच्या दृष्टीने राधानगरी धरणाचे ५ स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहेत तर कोयना, वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.