हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली Amazon ग्राहकांना भेडसावणारी एक मोठी समस्या लवकरच सोडवणार आहे. आता शॉपिंग केल्यावर आपल्याला बिल भरण्यासाठी यापुढे लांब लाईन मध्ये उभे रहावे लागणार नाही. Amazon Inc ने यासाठी एक कार्ट तयार केले असून जे न केवळ शॉपिंग साठी मदत करेल तर बिल पेमेंटसाठी आपल्याला लांब लाईनपासूनही वाचवेल.
या ई-कॉमर्स कंपनीने आता शॉपिंग स्टोअरच्या व्यवसायात हात घालण्यास सुरुवात केली आहे आणि या स्टोअरच्या माध्यमातून ही कंपनी स्मार्ट कार्टची चाचणी देखील करीत आहे. मात्र, कंपनी सध्या त्याचा वापर स्वत: च्याच स्टोअर्समध्ये करीत आहे, परंतु जर हे तंत्रज्ञान त्यांनी विकले तर इतर कंपन्याही त्याचा वापर करण्यास सक्षम होतील.
हे नवीन तंत्रज्ञान अशा पद्धतीने काम करेल
या कार्टच्या हँडलवर यादीसाठी एक जागा तयार केली आहे. आपण तिथे स्कॅन करताच आपल्याला एक यादी दिसेल. त्यानंतर जे सामान घ्यायांचे असेल ते त्या यादीनुसार त्या कार्टमध्ये येईल. यानंतर,निघताना कार्टमध्ये ठेवलेल्या वस्तूच्या यादीनुसार बिल दिसेल. ते स्कॅन करुन पैसे भरले जाऊ शकतात. यासाठी आपल्याला काउंटरवर जाण्याची गरज भासणार नाही.
वस्तू खरेदी करायला वेळ वाचेल
शॉपिंग मॉल्समध्ये, विशेषत: किराणा खरेदी दरम्यान, बर्याच वेळा भटकंती करावी लागते. Amazonच्या या स्मार्ट कार्ट यादीनुसार, जास्तीत जास्त वस्तूंच्या उपलब्धतेच्या उतरत्या क्रमाने खरेदी करेल. आपल्याला त्यातून कमीतकमी फिरावे लागेल. तसेच यामुळे वेळेची बचतही होईल
Amazon च्याच धर्तीवर आणखीही बरेच स्टार्टअप्स यावर काम करत आहेत
Amazon स्मार्ट कार्टच्या धर्तीवर अनेक स्टार्टअप्सही अशा प्रकारची सुविधा देण्याच्या विचारात आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये समान गाडीत ठेवण्यापूर्वी जवळच्या ठिकाणी ते स्कॅन करावे लागते तसेच हे खरेदीदारासही स्वत:लाच अनेक वेळा स्कॅन करुन घ्यावे लागते तर Amazon मध्ये सामान कार्टमध्ये ठेवताच स्कॅन होते आणि बिल तयार केले जाते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.