आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhaar Card : ज्या लोकांचे उत्पन्न हे टॅक्सच्या अधीन येते त्यांना दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो. या ITR फॉर्ममध्ये लोकांना आपले एकूण उत्पन्न, खर्च, गुंतवणूक आणि कर दायित्वाची माहिती द्यावी लागते. हि सर्व माहिती सरकारच्या अधीन असते. हे लक्षात घ्या कि, नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर मागील आर्थिक वर्षाचा ITR भरावा लागतो.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून ITR भरण्याची सुविधा दिली जाते. आता ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने ITR भरता येईल. मात्र, ऑनलाइन मोडद्वारे ITR दाखल करण्यासाठी ई-व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत ITR फाइल करणारा त्याचे ई-व्हेरिफिकेशन करणार नाही तोपर्यंत तो ITR अपूर्ण मानला जाईल आणि तो ITR इनव्हॅलिड ठरेल. Aadhaar Card

Aadhaar Card द्वारे ई-व्हेरिफिकेशन

इन्कम टॅक्स रिटर्नचे आधारद्वारे देखील ई-व्हेरिफिकेशन करता येते. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून UIDAI ने सांगितले की, आता तुम्हांला आधारद्वारे ITR ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येईल. यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. तसेच, यासाठी तुमचा मोबाईल नंबर देखील आधार कार्डशी जोडलेला असावा.

Aadhaar, ITR, ITR E-Verification, UIDAI, Income Tax Department, ITR e-verification with aadhar

अशा प्रकारे ई-व्हेरिफिकेशन करा

सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या  https://www.incometax.gov.in/iec/foportal वेबसाइटला भेट द्या.

येथे लिंक आधार पर्याय उघडा.

त्यात आधार नंबर टाका आणि पॅन नंबरचे व्हेरिफिकेशन करा.

याद्वारे पॅन आणि आधारची माहिती व्हेरिफाय केली जाईल.

आता ITR फाइलिंग वेबसाइटला भेट देऊन ITR फॉर्म भरा.

येथे Verification पर्याय निवडा.

आता आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP मिळेल.

दिलेल्या जागी OTP टाकून सबमिट वर क्लिक करा.

आता स्क्रीनवर Return successfully e-Verified असे लिहिलेले दिसेल.

याद्वारे ई-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Itr Filing: This Income Tax Return Violation May Land You In Jail. Details  Here | Mint

ITR भरण्याचे फायदे

ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच ज्यांचे उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही अशा लोकांनाही तज्ज्ञ आयकर रिटर्न भरण्याची शिफारस करतात. ITR भरल्यावर करदात्यांना एक सर्टिफिकेट मिळते. हा व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाचा पुरावा आहे. उत्पन्नाचा रजिस्टर्ड पुरावा असणे हे क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा स्वतःचे क्रेडिट सिद्ध करण्यास मदत करते. इतकंच नाही तर ITR मुळे देशाचा व्हिसा मिळवण्यातही मदत होते. Aadhaar Card

Income Tax Department conducts searches in Pune | A2Z Taxcorp LLP

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/

हे पण वाचा :

EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

 SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या

Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!

PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!

PAN Card शी संबंधित ‘हा’ नवा नियम आजपासून लागू !!! त्याविषयी जाणून घ्या

Leave a Comment