हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारत आणि कॅनडात झालेल्या वादामुळे भारत सरकारने कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा बंद केली होती. परंतु आता दोन महिन्यांच्या काळानंतर भारत सरकारने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडासोबतचे संबंध सुधारल्यानंतर भारत सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनेक कॅनडियन नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्यंतरी, खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांची हत्या भारतीय गुप्तहेर एजेन्सीने केल्याचा आरोप कॅनडाकडून लावण्यात आला होता. परंतु भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते या आरोपांमुळे भारत आणि कॅनडामध्ये नवा वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवरच भारत सरकारने ई-व्हिसा सेवा बंद करून टाकली होती. यानंतर याबाबत कॅनडियन नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता कॅनडा आणि भारततील संबंध पूर्वरत होत असल्यामुळे सरकारने पुन्हा या सेवेला सुरू केले आहे.
दरम्यान, काही विशिष्ठ श्रेणीतील नागरिकांसाठी व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. परंतु मध्यंतरी झालेल्या वादामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. जिला आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता कॅनडियन नागरिकांना भारतीय आयुक्तालयात न जाता थेट ऑनलाईन पद्धतीने भारतीय व्हिसासाठी अप्लाय करता येणार आहे.