पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले असून, ४.८ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. सुदैवाने या भूकंपात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
India Meteorological Department: An earthquake of magnitude 4.8 on the Richter scale hit Palghar, at 5:22 am, today. #Maharashtra
— ANI (@ANI) December 14, 2019
संप्टेंबर महिन्यात देखील याच परिसरात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले होते. शनिवारी बसलेल्या धक्क्यात काही घरांच्या भिंतींना तडे गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-३ मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळानंतर पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.