Home Loan ची परतफेड लवकरात लवकर करण्याचा मार्ग जाणून घ्या

Home Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. मात्र त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना बहुतेक लोकांकडून होम लोन घेतले जाते. यामुळे आर्थिक मदत मिळते. मात्र करताना EMI द्वारे दरमहा मोठी रक्कम भरावी लागते. तसेच सध्याच्या काळात व्याजदर वाढल्यामुळे ते आणखी महागले आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला आपले लोन शक्य तितक्या लवकर चुकवायचे असते. हे लक्षात घ्या की, असेही काही मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने आपल्याला होम लोनची परतफेड लवकर करता येऊ शकते. जर आपणही Home Loan घेतले असेल आणि त्याच्या EMI बाबत आपण चिंतेत असाल तर ते लवकर परत करण्याचे काही मार्ग आज आपण जाणून घेउयात.

Bank vs HFC home loan rate: Find out lowest home loan rates for loan above  Rs 30 lakh to Rs 75 lakh

कर्जाचा कालावधी शक्य तितका लहान ठेवा

जर आपण Home Loan घेत असाल तर त्याच्या परतफेडीसाठी कमीत कमी कालावधीचा पर्याय निवडा. यामुळे जास्त EMI जरी द्यावा लागत असला तरी कर्जावरील व्याजाचा भार कमी होईल आणि आपल्या कर्जाची लवकर परतफेड करता येईल. याशिवाय, होम लोनवरील व्याज आणि मुद्दल पेमेंटसाठी कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. हे पैसे वाचविण्यात मदत करू शकतात.

What is a house loan? - Times of India

कमी व्याज दर असणाऱ्या बँकेतून कर्ज घ्या

Home Loan घेताना नेहमीच कमी व्याजदराने कर्ज देणार्‍या बँकेकडून कर्ज घ्या.कारण असे केल्याने आपला EMI चा भार हलका होण्यात मदत होईल. तसेच कर्जाची परतफेड करताना, आपल्या होम लोनच्या परतफेडीचा कालावधी कमी करण्यासाठी EMI रक्कम थोडथोडी वाढवता येईल. होम लोनच्या परतफेडीमध्ये EMI मध्ये दरवर्षी 10% वाढ करण्याचा पर्याय देखील मिळतो.

Home loan demand slows down as RBI hikes rates, BFSI News, ET BFSI

पार्ट री-पेमेंटचा पर्याय निवडा

Home Loan ची लवकर परतफेड करण्यासाठी वर्षातून एकदा पार्ट री-पेमेंटचाचा पर्याय निवडता येईल. याद्वारे कर्जाचा काही भाग फेडता येईल. तसेच अशा प्रकारे, जर एकूण कर्जाच्या रकमेच्या 20-25% रक्कम भरली तर होम लोनची मूळ रक्कम लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे EMI ची रक्कम किंवा कर्ज परतफेडीचा कालावधी देखील कमी होईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://homeloans.sbi/

हे पण वाचा :
Torn Notes : फक्त ‘या’ बँकांमध्येच बदलता येतात फाटक्या नोटा, जाणून घ्या त्यासाठीचे नियम
Gold Price Today : गुढीपाढव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोने चमकले, तपासा आजचे नवे दर
Realme C35 स्मार्टफोनवर मिळवा आतापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर, फीचर्स तपासा
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर