रात्री उशीरा जेवण करताय? मग ‘या’ गोष्टी जाणून घ्याच…

Eating Food
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसभरात सुरू असलेल्या धावपळीत आपल्याला अनेकवेळा भूक लागते. पण जेवण करायचे राहून जाते. तर कधी उशिरा जेवण केले जाते. घाईघाईत आणि उशिरा हेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. उशिरा जेवण करण्याचे काय दुष्परिणाम होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत…

अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. तज्ञांच्या मते जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी खूप समस्या उध्दभवतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे रात्री उशिरा अन्न खाण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चरबी वाढण्याची शक्यता वाढते. रात्री उशिरा जेवल्याने पोटात आणि छातीत आम्लपित्त आणि जळजळ होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर आणि रक्तदाबावरही परिणाम होतो. त्यामुळे रात्री वेळेवर खाण्याचा प्रयत्न करावा.

1) रक्तदाब अनियंत्रित होणे

रात्री उशीरा जेवल्याने सर्वात जास्त परिणाम होतो ते रक्तदाबावर होय. उशिरा जेवल्याने शरीरातील रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता जास्त असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने रात्री उशीरा जेवणे टाळावे.

2) वजन वाढणे

आपल्याला रात्री उशीरा जेवणाची सवय असेल तर आताच मोडा. कारण त्यामुळे आपले वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.

3) झोप पूर्ण न होणे

आपले शरीर उत्तम व आरोग्यदायी ठेवायचे असेल तर रात्री झोप घेणे आवश्यक आहे. मात्र, रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.

4) पचनाशी निगडित समस्या

आपल्या उत्तम आरोग्यासाठी रात्री उशीरा जेवणे घातक ठरू शकते. जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे उशीरा जेवणाची सवय प्रत्येकाने टाळावी.

5) शरीरातील ऊर्जा कमी होणे

रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.