राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

परंतु ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यावरुन भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपकडून सूडबुद्धीने ईडीची चौकशी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आणि अमोल मिटकरी यांनी केला. परंतु, एकनाथ खडसे भक्कम आहेत, ते भाजपला पुरुन उरतील, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच आपली ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. तसंच त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशाराही दिला होता. त्यामुळे आता अखेर एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर ते सीडी लावतात का आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like