सलग दुसऱ्या दिवशीही जालन्यात ईडीचे छापे

जालना – जालन्यात ईडीच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी छापे सुरू आहेत. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शनिवारी ईडीच्या पथकाकडून झाडाझडती सुरू आहे. कालपासून ईडीचे पथक जालन्यात छापेमारी करत आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर जालना तालुक्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आरोप केले होते. त्यानंतर ईडीचे पथकाने शुक्रवारी (ता.२६) जालन्यात तीन ते चार ठिकाणी छापे टाकले होते. शुक्रवारी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी, जुना मोंढा व जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ईडीच्या पथकाने छापे टाकले होते.

शुक्रवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजेपर्यंत ईडीचे पथकाकडून अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली. त्यांनतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ईडीच्या पथकाचे दोन वाहने सुरक्षा अधिकाऱ्यांसह जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पुन्हा दाखल झाले आहे. ईडीच्या पथकाकडून बाजार समिती येथील विविध कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. माहिती पुढे आली आहे. दरम्यान शनिवारी सकाळपासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करत खोतकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

You might also like