कोरोनाव्हायरसच्या नवीन व्हेरिएंट ‘Omicron’ वर ही लस प्रभावी आहे का? Pfizer काय म्हणाले ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

न्यूयॉर्क । कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट ‘Omicron’ ने जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे. प्राथमिक माहितीनुसार शास्त्रज्ञ याला अत्यंत धोकादायक मानत आहेत. आफ्रिकन देशांमध्ये सापडलेल्या या नवीन व्हेरिएंटबद्दल असे म्हटले जात आहे की, ते लोकांना वेगाने संक्रमित करते. अशा परिस्थितीत सध्या कोरोनावर जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो. यावर अमेरिकन कंपनी फायझरने म्हटले आहे की,”सध्या काहीही स्पष्टपणे सांगता येणार नाही.” मात्र, येत्या शंभर दिवसांत यासाठी नवीन लस तयार करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अमेरिकेच्या CBC न्यूजनुसार, फायझरने एक निवेदन जारी केले आहे की,” ते सध्या Omicron विरूद्ध सध्याच्या लसीची चाचणी करत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर ती प्रभावी ठरली नाही, तर सध्याच्या लसीमध्ये काही बदल करून नवीन लस तयार केली जाईल.” रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीचे निकाल येत्या दोन आठवड्यांत समोर येतील.

ओमिक्रॉन जास्त धोकादायक आहे
दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की,”Omicron मध्ये मागील व्हेरिएंटसपेक्षा जास्त म्युटेशन दिसून येत आहे.” दक्षिण आफ्रिकेतील साथीचे रोग विशेषज्ञ सलीम अब्दुल करीम यांनी CBC न्यूजला सांगितले की,”नवीन व्हेरिएंटवर सध्याच्या लसी काम करत नाहीत ही चिंतेची बाब आहे. याशिवाय त्याचा प्रसारही झपाट्याने होत आहे. “जर हा व्हेरिएंट डेल्टा पेक्षा जास्त वेगाने पसरला तर अंदाज करणे फार अवघड जाईल,” असे करीम म्हणाले.

नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता
कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटला आधी B.1.1.529 असे नाव देण्यात आले होते, मात्र आता WHO ने म्हटले आहे की,”ते Omicron म्हणून ओळखले जाईल. तसेच, ‘व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न’ या कॅटेगिरीमध्ये ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ कोरोना विषाणूच्या या नवीन व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून येत्या काही दिवसांत त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.” WHO ने एका निवेदनात म्हटले आहे की,”ही चिंतेची बाब आहे की कोरोनाच्या या व्हेरिएंटमध्येही वेगाने म्युटेशन होत आहे.

Leave a Comment